दुर्गसावंगी येथे बसवर दगडफेक एकावर पोलिसात गुन्हा दाखल

दुर्गसावंगी येथे बसवर दगडफेक एकावर 
पोलिसात गुन्हा दाखल 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
18 एप्रिल 2023

हिंगोली : तालुक्यातील दुर्गसावंगी येथे बस आल्यानंतर जागा पकडण्याच्या कारणावरून दगडफेक केल्याची घटना घडल्याने बासंबा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली आगाराची बस क्रमांक एमएच १५

 बसवर दगडफेक करून फोडली काचः चालकाच्या फिर्यादीवरून बासंबा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला 
बस  क्रमांक 
बीटी १६६९ ही बस दुर्गसावंगी येथे १६ एप्रिल रोजी आली असता बसमध्ये जागा पकडण्याच्या कारणावरून दोन प्रवाशात वाद घडला. यामध्ये बसवर दगडफेक केल्याने काही वेळ प्रवाशी घाबरुन गेले होते. यामध्ये बसचे काही
प्रमाणात नुकसान झाल्याने बसच चालक सांरगधर आगलावे यांनी बासंबा पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश-पंजाब कवडे रा. दुर्गसावंगी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि नानाराव पोले हे करीत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने