ग्रामपंचायतचा हलगर्जीपणा जिल्ह्यात ४६ ठिकाणी पाण्याचे नमुने दुषीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 ग्रामपंचायतचा  हलगर्जीपणा जिल्ह्यात ४६ ठिकाणी पाण्याचे नमुने दुषीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
मंगळवार18 एप्रिल 2023

हिंगोली : जिल्ह्यात प्रत्येक महिन्यामध्ये पाणी पुरवठ्यांच्या नमुन्याचे प्रयोग शाळेत तपासणी केली जाते. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी पाण्याचे नमुने घेण्यात आले असता ८ सार्वजनिक स्रोतासह ४६ ठिकाणी पाण्याचे दुषीत नमुने आढळुन आले.

ग्रामपंचायत चे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

हिंगोली जिल्ह्यात भुजल संर्वेक्षण यंत्रणा व आरोग्य विभागातर्फे प्रयोग शाळेमध्ये पाणीस्त्रोत तपासणीसाठी प्रत्येक महिन्यात घेतले जातात. यामध्ये सेनगाव तालुक्यातील कहाकर, सुकळी बु., वलाना, हिवरा येथील जलस्वराज्य विहिरीच्या पाण्याचे नमुने दुषीत आढळले. तसेच नानसी येथील सार्वजनिक विहिर, सेनगाव तालुक्यातील वटकळी, हाणकदरी येथील पाण्याचे

जलकुंभ तर बन येथील नळ योजनेच्या पाणीस्त्रोताचा समावेश आहे. त्याच प्रमाणे ब्राम्हणवाडा, घोरदडी, साखरा, शिवणी बु. उर्टीपुर्णा येथील हातपंपाचे पाणी नमुने दुषीत आढळुन आले आहेत. कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी, सांडस, सोडेगाव, फुटाना, चुंचा, गिरामवाडी, सोडेगाव, टाकळगव्हाण, आखाडा बाळापुर, डोंगरगाव पुल, रेणापुर, पिंपरी बु. कान्हेगाव, कुपटी, हिंगोली तालुक्यातील खंडाळा, बेलुरा, बाझोंळा, खंडाळा या गावातील हातपंपातील पाणी नमुने दुषीत आढळुन आले. या दुषीत पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने आरोग्य विभागाचे  जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी 
 संबंधित ग्रामपंचायतला तात्काळ पाण्याचे शुध्दीकरण करण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने