धान्य घोटाळागोदामपालास अटक 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

 
धान्य घोटाळा
गोदामपालास  अटक 
21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
19 एप्रिल 2023

हिंगोली सेनगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने २ कोटी रुपयाचे अतिरिक्त धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप केल्याने ११ अधिकारी, कर्मचान्यासह ६० राशन दुकानदारावर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्कालीन गोदामपालास अटक केली असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

सेनगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने सन २००४ ते सन २०१८ या कालावधीत तब्बल दोन कोटी रुपयाचे अतिरिक्त धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप केल्याने अॅड. विजय राऊत यांनी सदर प्रकरणाची तक्रार न्यायालयात केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर तत्कालीन जिल्हा
गुन्हे शाखेचीही मदत घेतली जाणार राशन घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे •सोपविण्यात आला आहे. गुन्ह्यात आरोपी संख्या अधिक असल्याने त्यांना ताब्यात घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचीही मदत घेतली जाणार असल्याची   विश्वासनीय सूत्राची माहिती

पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तत्कालीन तहसीलदार मेंढके यांच्यासह १२ अधिकारी, कर्मचारी व ६० रास्तभाव दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक- जी श्रीधर यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. पथकाने सदर कालावधीमधील कागदपत्राची मागणी सेनगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे केली होती. या दरम्यान तत्कालीन जिल्हा
पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांनी
 जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केल्यानंतर अंतरीम जामीन मिळाला होता. पुरवठा विभागामार्फत पोलिसांनी मागविलेल्या माहितीनुसार कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, जमादार अनिल भुक्तर, यादव, जाधव यांच्या पथकाने आरोपींची. शोध मोहिम सुरू केली. ज्यामध्ये सेनगावातील तत्कालीन व सध्या औंढा नागनाथ येथील कार्यरत गोदामपाल ईश्वर ढेकळे याला १८ एप्रिल रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता २१ एप्रिल पर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या आरोपीच्या अटकेमुळे इतर आरोपींनी देखील सावध पावित्रा घेऊन भुमिगत झाले आहेत. 
आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने धन्य  घोटाळ्यातील आरोपीची  धरपकड सुरू 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने