परीक्षेला गेलेली तरुणी झाली बेपत्ताबाळापुर पोलिसात गुन्हा दाखल

परीक्षेला गेलेली तरुणी झाली बेपत्ता
बाळापुर पोलिसात गुन्हा दाखल 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 एप्रिल 2023

आखाडा बाळापूर : घरून परीक्षेला म्हणून गेलेली महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता झाली आहे. तिला कोणीतरी अज्ञाताने पळवून नेले असल्याची
तक्रार तिच्या पित्याने 
त्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील रहिवासी असलेले गंगाधर शिवलिंग सोनवणे यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली.
मुलीचे वय १७ वर्षे ११ महिने असल्याचे त्यांनी सांगितले. ही अल्पवयीन मुलगी घरून कॉलेजला परीक्षेकरिता जातो म्हणून गेली होती. परंतु ती घरी परत आलीच नाही. अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणाकरिता तिला पळवून नेले असल्याची तक्रार देण्यात आली. गंगाधर सोनवणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध १८ एप्रिल रोजी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने