मराठवाडा मुक्ती संग्राम गौरव समितीवर भाऊराव पाटील गोरेगावकर यांची निवड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 एप्रिल 2023
काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत
17 सप्टेंबर 2022 पासून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे या पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्या लढ्याच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस चे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत करण्यात आली आहे या समितीमध्ये हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची वर्णी लागली आहे
15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या जुलमी जाचातुन स्वतंत्र झाला असला तरी निजामाच्या अधिपत्याखालील मराठवाडा तसेच चंद्रपूर व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागासह संपूर्ण हैदराबाद संस्थानावर निजामाची राजवट होती निजामाने स्वतंत्र भारतात सामील होण्यास स्पष्ट नकार दिला होता यामुळे थोर गांधीवादी नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठीच्या क्रांतिकारी लढ्यास सुरुवात झाली होती या लढ्यात अनेक देशभक्त क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले,अत्याचार सहन केले अखेर भारत सरकारने हैदराबाद संस्थानांमध्ये पोलीस कारवाईस सुरुवात केली व 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामी राजवट असलेल्या हैदराबाद संस्थानाचे स्वतंत्र भारत देशात विलनीकरण करण्यात आले महाराष्ट्रात या लढ्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा म्हणून ओळखले जाते
दिनांक 17 सप्टेंबर 2022 पासून या ऐतिहासिक लढ्याचे 75 वे अर्थात अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे खरे तर हे वर्ष शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरे होणे आवश्यक होते याबाबत महाराष्ट्र काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य सरकारला अनेकदा स्मरणही करून देण्यात आले मात्र मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षा बाबत शासनाची सतत अन्नस्था व उदासीनता दिसून आली हे ऐतिहासिक अमृत महोत्सवी वर्ष सुरू होऊन 7 महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही लक्षवेधी व व्यापक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसून येत नाही या पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्या लढ्याच्या इतिहासाला जाज्वल उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचीही वर्णी लागली आहे या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सहा अध्यक्ष म्हणून बसवराज पाटील व माजी मंत्री अमित देशमुख यांची वर्णी लागली आहे
टिप्पणी पोस्ट करा