घराची जाळपोळ करणाऱ्या आरोपीची निर्दोश मुक्तता.
हिंगोली न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 एप्रिल 2023
मौजे धानोरा जाहागिर ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे फिर्यादी यांनी दि.०५/११/२०२२ रोजी पो.स्टे. कळमनुरी येथे जावून फिर्याद दिली होती. आरोपी यांने राहते घर जाळून टाकले त्यामध्ये घरातील संसार उपयोगी वस्तु व पाच कुंटल कापूस जळून खाक झाले. आरोपावरून पो.स्टे. कळमनुरी येथे गुरनं. ४६२ / २०२२ हा गुन्हा आरोपी नामे संतोष दत्तराव मस्के याच्या विरुध्द कलम ४३६,४२६,४२७ भा. द.वी. प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता तरी त्याचे दोषारोप पत्र (सत्र खटला क्र.12/2023) माहाराष्ट्र शासन विरुद्ध संतोष मस्के जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दाखल करण्यात आले होते.
तरी सरकारी पक्षा तर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते व दोन्ही पक्षाचे
अंतीम युक्तीवाद ऐकुन वि न्यायधिश श्री. डी. जी. कांबळे यांनी दि. २७/०४/२०२३)
रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली...
आरोपीच्या वतीने अॅड. सतीश देशमुख अॅड सौ. सुनीता देशमुख, अॅड शामकांत देशमुख, अॅड प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अँड अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी काम पाहिले व युक्तीवाद केला व त्यांना अॅड. शरद देशमुख अॅड आदीत ऊर्फ शुभम सतीश देशमुख अॅड आरीफ पठाण, अँड राहूल देशमूख अँड विराज देशमुख, अॅड योगेश खिल्लारी (पाटील) अँड रजत देशमुख, अँड अविनाश राठोड, अँड प्रकाश मगरे, अॅड आनंद खिल्लारे, अॅड सुमीत सातव, अँड मुददसीर अ. रहीम अँड लखन पठाडे, अँड श्रध्दा जैस्वाल मॅडम अॅड आकाश चव्हाण, अॅड शुभम मुदीराज यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा