येहळेगाव (ता.औंढा नाग. जि. हिंगोली) बहुचर्चित असलेल्या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर...

कथीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवनिमित्त लावलेले झेंडे, पताके प्रकरणात आरोपीला रेग्युलर जामीन मंजूर..

वसमत जिल्हा न्यायालयाचा  आदेश

25 एप्रिल 2023

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क

येहळेगाव ता.औंढा ना. जि. हिंगोली येथील कथीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवनिमित्त लावलेले झेंडे, पताके प्रकरणात फिर्यादी महाराष्ट पोलीस औंढा ना. स्टेशन त्यामधील  येथे घडलेला गुन्हा क्र. 113/2023 कलम 353, 500, 186, 153, 107, 34 भा. द. वी Police (Incitement To Disaffection) Act 3(1) अन्वये पोलीस स्टेशन औंढा ना. येथे नोंदविण्यात आला होता. 

त्यामधील आरोपी नामे रवी विलास घोंगडे यांने वि. सत्र न्यायालय वसमत येथे जामीनाचा अर्ज केला असता विद्यमान सत्र न्यायाधिश यांनी त्याचा जामीनाचा अर्ज दि.25.04.2023 रोजी मंजुर केला आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश मा. श्री.आर. आर. हस्तेकर साहेब यांनी दोन्ही पक्षाचायुक्तीवाद ऐकुण आरोपीची  रेग्युलर जामीन मंजुर केला.आरोपीच्या वतीने युक्तिवाद ॲड.पी.पी.तपासे यांनी केला व त्यांना ॲड. नागेश अंभोरे, ॲड.सिराज शेख यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने