कत्तीने वार करणाऱ्या आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

कत्तीने वार करणाऱ्या आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

 हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; दहा हजारांचा दंडही भरावा लागणार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
शनिवार 13 मे 2023

   जुन्या भांडणाच्या कारणावरून कत्तीने वार करून बाप व लहान मुलास जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी हा निकाल
सुनावला. 
कळमनुरी येथील शेख अहमद शेख इब्राहिम है १८ मे २०२० रोजी सायंकाळी वाजता त्यांचा लहान मुलगा हसनाईन (3 वर्षे) यास कडेवर घेऊन अण्णा भाऊ साठे नगरातील फेरोज पठाण यांच्या किराणा दुकानातून सामान खरेदी करीत होते.
सखाराम इंगळे (रा. कळमनुरी) हा हातात लोखंडी कत्ता घेऊन आला व तू मला पुडी खाऊ घाल असे म्हणाला यावर शेख अहमद यांनी पैसे नसल्याचे सांगितले, जर तुझ्याकडे पैसे नाहीत तर तू मुलाला गोळ्या बिस्किटे कसे काय घेऊन दिले असे म्हणून गोविंद इंगळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून
यांनी बजावली महत्वाची भूमिका सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सविता एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी वकील एस. डी. कुटे, एन. एस. मुटकुळे, पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, कोर्ट पैरवी अधिकारी के. आर. डुकरे, पोलिस अंमलदार बी. के. अंभोरे यांनी सहकार्य केले.
यावेळी तेथे गोविंद संग्राम ऊर्फ
शेख अहमद यांच्यावर लोखंडी कल्याने जोराचा वार केला,
पुन्हा दोन वार केले ते कडेवर असलेल्या लहान मुलाच्या उजव्या पायाच्या पंजावर लागले. यात मुलगाही गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांनी गुन्ह्याचा पारित केले.

तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांच्यासमोर चालले. १२ मे रोजी न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी गोविंद ऊर्फ संग्राम सखाराम इंगळे (रा. कळमनुरी) यास कलम ३२६ भादंविनुसार दोषी ठरवून ५ वर्षे कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली, दंडाची रक्कम फिर्यादी व त्यांचा मुलगा हसनाइन यास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने