जवळा बाजार येथे सराफा व्यापाऱ्याचे हातपाय बांधून सोन्या चांदीचे दागिने लंपास

 जवळा बाजार येथे सराफा व्यापाऱ्याचे हातपाय बांधून सोन्या चांदीचे दागिने लंपास

 महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
 सोमवार15 मे 2023 

 शटर बंद करून तिजोरी ठेवण्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने गोळा करताना दोघांनी दुकानाचे शटर वर करून दुकानात प्रवेश केला व चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधले व सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले 
दरम्यान 
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे आठवडी बाजार संपवून दुकान बंद करत असताना अचानक दुकानात शिरलेल्या दोघांनी सराफा व्यापाराची हातपाय बांधून पलायन केले. सोन्या-चांदीचा ऐवज पळवल्याची घटना रविवारी (१४ मे) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी झालेल्या झटापटीत सराफा व्यापाऱ्याला चाकूमुळे दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जवळा बाजार येथे राजू पाथरकर यांचे पाथरकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आठवडी बाजार असल्यामुळे पाथरकर यांनी रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवले. रात्री दुकानाचे
चोरटे  पळून गेल्यानंतर पाथरकर यांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे जवळाबाजार पोलीस चौकीचे उपनिरीक्षक सतीश तावडे जमादार भुजंग कोकरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व नागरिकांनी जखमी पाथरकर यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
दरोडेखोराचा 
सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे सहायक पोलीस निरीक्षक गजानन  बोराटे यांनी सांगितले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने