हिंगोलीत जागतिक परिचारिका दिन साजरा



 हिंगोलीत जागतिक परिचारिका दिन साजरा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
13 मे 2023
हिंगोली
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या शासकीय परिचर्या विद्यालय जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथमता यांच्या फ्लोरेंस नाईटईगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉ.विठ्ठल रोडगे, डॉ.दिपक मोरे, डॉ.नितीन  पुरोहित , अधिसेविका लतीफा बानू राठोड,  प्र.सहायृयक अधिसेविका आशा क्षीरसागर,शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता भालेराव, पाट्यनिर्दीशीक कुलदिप कांबळे, 
 प्र. पाट्यनिर्दीशीका वर्षा खंदारे, अश्विनी जाधव,  प्रिती पारधे प्र.पाट्यनिर्देशक सुनिल दिंडे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
जागतिक परिचारिका दिनानिमित्त महाविद्यालयात सर्वांनी नर्सिंगची प्रतिज्ञा घेतली.  यावेळी डॉ विठ्ठल रोडगे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन केले.त्याच प्रमाणे  डॉ.दिपक मोरे यांनी ही मार्गदर्शन केले. 

जागतिक परिचारिका दिनानिमित्त मागील आठदिवसा पुर्वी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेतील विजेत्यांना आज प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कविता भालेराव यांनी केले. सुत्रसंचलन ऐश्वर्या तेलंगे अंकिता जाधव यांनी केले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने