धावत्या बसला आग; ३५ प्रवाशांचा जीव वाचला हिंगोली शहरातील घटना : चालकाच्या सतर्कतेने वेळीच आग अटोक्यात
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 मे 2023
हिंगोली नांदेड जिल्ह्यातील भोकरहून अकोलाकडे निघालेल्या एसटी बसला आग लागल्याची घटना हिंगोली शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात १९ मे रोजी रात्री ७:३० च्या सुमारास घडली. दरम्यान, चालकाच्या सतर्कतेने ही घटना वेळीच लक्षात आल्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला उभी करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
भोकर आगाराची एम.एच.२० बीएल ३५६६ ही बस ३० ते ३५ प्रवाशांना घेऊन भोकरहून दुपारी ३ च्या सुमारास
अकोलाकडे निघाली. बस नांदड, वारंगा फाटा, कळमनुरी, हिंगोली, वाशिममार्गे अकोला येथे जाणार होती. परंतु ही बस नांदेड- हिंगोलीमार्गे शहरातील नाईकनगर भागात दाखल होताच पाठीमागील चाकाजवळून धूर निघत असल्याचे चालक भाई यांच्या लक्षात आले. त्यांनी सतर्कता बाळगून बस रस्त्याच्या कडेला उभी करून
प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत मात्र टायरने पेट घेतला होता. त्यामुळे प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली होती. काही प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी तत्काळ धाव घेऊन पेट्रोल पंपावरील अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. ही घटना लायनर जाम झाल्यामुळे घडली असावी, अशी शक्यता चालकाने वर्तविली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. तर, या मार्गावरील वाहनेही काही वेळ थांबली होती. आग झाले.
आटोक्यात आणण्यासाठी सुरेश वायकुळे, अरुण गडदे, संदीप घुगे यांच्यासह पेट्रोल पंपावरील कर्मचान्यांनी पुढाकार घेतला. घटनेची माहिती हिंगोली एसटी आगाराला कळविण्यात आल्यानंतर आगारप्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे अडकून पडलेल्या वाशिम, अकोलाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हिंगोली आगाराच्या वतीने एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर पुढील प्रवासासाठी प्रवासी रवाना
टिप्पणी पोस्ट करा