तापमानात वाढ नागरिकांनी जास्तीचे पाणी प्यावे डॉ अधिकारी नामदेव कोरडे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 मे 2023
हिंगोली मागील काही
दिवसापासून सूर्य कोपल्यामुळे उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. अनेकजणांना विविध कामांकरिता घराबाहेर पडावे लागते. द्रव्य अशा वेळी उष्णतेला हरवीत असताना नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे असे आवाहन हिंगोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी केले आहे.
सध्या उष्णतेची लाट सर्वत्र सुरू आहे. येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागरिकांनी पांढरे कपड्याचा वापर करावा
विनाकारण दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत
ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी बाहेर पडू नये
त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसताना देखील पाणी प्यावे, घरून आणलेले ताक, लिंबु, पाणी, नारळ पाणी, फळांचे रस असे पदार्थ घ्यावे, घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल, किंवा छत्री वापरावी, दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडु नये, थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला, उन्हाला अडवावे, प्रवासाच्या वेळी पाण्याची बाटली जवळ बाळगावी, पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे, भाज्या आहारात ठेवाव्यात, 20 कलिंगड, टरबुज, खरबुज, संत्री,
द्राक्ष, काकडी, अननस, आहारात ठेवावी, हलक्या रंगाचे पातळ सेल सुती कपडे परिधान घराबाहेर करावे, पडणार. असल्यास आपली कामे शक्यतो सकाळी अथवा सायंकाळी उरकावेत, दिवस घरातील खिडक्या बंद ठेवून पडदेही सारावेत जेणे करून थेट सूर्यप्रकाश घरामध्ये येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या बाबीची खबरदारी घेण्याचे आवाहन हिंगोलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी केले
टिप्पणी पोस्ट करा