सहा महिन्यात १५ गावगुंडांना तुरुंगाची हवा एम.पी. डी. ए. अंतर्गंत करवाई
पोलीस अधीक्षक जी श्रीधर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
रविवार 21 मे 2023
हिंगोली : प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही वर्तनात सुधारणा न करणाऱ्या तसेच समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्यांवर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. मागील सहा महिन्यात १५ गाव गुंडावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सहा महिन्यापूर्वी जिल्ह्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी अवैध धंदे चालकांविरुद्ध कारवाईचा धडाका लावला. आहे
तसेच सतत गुन्हे करणाऱ्या व समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्यांना हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पाठविले जात आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून 'दादागिरी करणाऱ्यांवरही एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कार्यवाही करून स्थानबद्ध करण्यात येत आहे. जी. श्रीधर यांनी मागील सहा महिन्यात होती. १५ जणांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केले होते. या प्रस्तावाची पडताळणी करून सहा महिन्यात १५ जणांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये थेट एक वर्षासाठी तुरुंगात रवानगी करण्यात आली. यामुळे ' आता दादा', 'भाईगिरी गावगुंडांचे धाबे दणाणले आहेत.
हिंगोलीतील पुन्हा एकाची तुरुंगात रवानगी
हिंगोलीतील करण उर्फ गणेश बालाजी बांगर (वय २० रा. वंजारवाडा हिंगोली) याचेवरही एम. पी.डी.ए. कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात आली. त्याचेविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे हद्दपारीची कार्यवाही केली
यानंतरही तो सतत गुन्हे करीत होता. समाजासाठी धोकादायक ठरत असल्याने त्याचेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कार्यवाही करावी, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी करण बांगर यास एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत
यापुढे भाईगिरी दादागिरी गाव गुंडावर कारवाई सुरूच राहील असे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा