वाशिम हिंगोली राज्य महामार्गावर अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार

वाशिम हिंगोली राज्य महामार्गावर अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 मे 2023 
सुधाकर डुकरे

 कनेरगाव नाका : वाशिम हिंगोली राज्य महामार्गावर आज दिनांक 20 मे रोजी दुपारी 1 वाजता सायखेडा - राजगाव दरम्यान वाशिम कडून कनेरगावाकडे दुचाकी क्रमांक 38 यु 7249 या गाडीवर रा . सवना तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील प्रकाश परसराम राठोड व 28 वर्ष हा मोटर सायकलने वाशिम वरून कनेरगाव कडे येत असताना  पाठी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने प्रकाश राठोड हा जागीच ठार झाला 
दरम्यान दुपारची वेळ असल्याने 
  राज्य महामार्गावर कोणीच   नव्हते त्यानंतर थोड्या वेळाने काही रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी अपघात मध्ये ठार झालेल्या तरुणाबद्दल वाशिम ग्रामीण पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी आले व सदरील तरुणाची माहिती घेऊन त्यांच्या नातलगांना कळविले व मयत तरुणाला वाशीम येथे पोस्टमार्टम करिता नेण्यात आले पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहेत 
अचानक अपघातामुळे सवना येथील राठोड परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने