रिडयुज, रियुज आणि रिसायकल उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे-मुख्याधिकारी अरविंद मुंढे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
शनिवार 27 मे 2023
हिंगोली
येथील नगर परिषदेच्यावतीने मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियानांतर्गत रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल सेंटर दि.२० मे ते ५ जुन दरम्यान स्थापन करण्यात आले आहे. सदरील उपक्रमात शहरातील स्वच्छताप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे.
केंद्रिय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर हे अभियान राबविण्याचे निर्णय घेतले असुन या अभियानाअंतर्गत नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल सेंटर म्हणजेच ठठठ केंद्र स्थापन करण्यात आले. मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियानांतर्गत रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल सेंटर स्थापन करण्यात आले आहे. सदरील उपक्रमात शहरातील स्वच्छताप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे. सदरील रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल केंद्र नगर परिषद कार्यालयात दि.२० मे रोजी ते दि.५ जुन २०२३ दरम्यान सकाळी १० ते दुपारी ५ वाजे पर्यंत सुरु राहणार आहे. नगरपरिषद आणि शहरातील प्रमुख बचतगटांच्या सहाय्याने शहरात नगरपरिषद ईमारत ठिकाणी रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सदरील केंद्रामध्ये नागरीकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टीक, निरोपयोगी फायबर वस्तु, जुने कपडे, पादत्राने, प्लॉस्टीक जन्य वस्तु, लाकडी निरुपयोगी साहित्य इत्यादी वस्तु तथा घरात असलेली ईतर निरउपयोगी वस्तु सदरील रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल केंद्रात जमा करावे. तसेच गरजूंनी सदर केंद्रात असलेले साहित्य घेऊन जावे. सदरील केंद्रात जमा होणार्या निरोपयोगी वस्तुंची पुनर्रवापर, पुर्नउपयोग होणार असुन या उपक्रमाचा लाभ शहरातील नागरीकांनी घेऊन घरात अथवा परिसरात असलेल्या निरोपयोगी वस्तु संकलन केंद्रास देऊन हिंगोली शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपले अनमोल सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी
अरविंद मुंढे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा