हिंगोली परभणी नायब तहसीलदारांच्या बदल्या

हिंगोली परभणी नायब  तहसीलदारांच्या बदल्या तात्काळ हजर होण्याचे आदेश 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 मे 2023 

हिंगोली  नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या महसूल व वन विभागाने गुरुवारी केल्या. यामध्ये जिल्ह्यातील तीन नायब तहसीलदारांच्या इतरत्र बदली झाल्या ईतर जिल्ह्यातील   नायब तहसीलदार रुजू होणार आहेत.

नायब तहसीलदार संवर्गातील ५६ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. हे आदेश सहसचिव श्रीराम यादव यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. बदली आदेशामध्ये हिंगोली  परभणी जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश आहे. ज्यात सेलू वसंतराव थारकर यांची पूर्णा तहसीलला निवासी नायब तहसीलदारपदी बदली झाली. पाथरी तहसीलचे नायब तहसीलदार के.व्ही. वाघमारे यांची छत्रपती संभाजी नगर
तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार म्हणून बदली झाली. सोनपेठचे तहसीलदार अनिल मल्हारी घनसावंत यांची न.प. प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय येथे नायब तहसीलदार म्हणून बदली झाली.

जिल्ह्यामध्ये कळमनुरी तहसीलचे नायब तहसीलदार सतीश पद्माकर पाठक हे परभणी तहसीलमध्ये नायब तहसीलदार पदी रुजू होणार आहेत. हिंगोलीच्या नायब तहसीलदार अनिता  प्रभाकर वडवळकर या परभणी तहसीलच्या निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार म्हणून जाणार उस्मानाबादचे नायब तहसीलदार कुलदीप कुलकर्णी हे मानवतला नायब तहसीलदार म्हणून तर औंढा येथील सचिन  जोशी हे जिंतूर तहसीलमध्ये नायब पि तहसीलदार म्हणून रूजू होणारं आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने