वसमत शहरात जावयाने केला सासुचा खून पोलिसात गुन्हा दाखल

वसमत शहरात जावयाने केला सासुचा खून पोलिसात गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
मंगळवार 9 मे 2023
हिंगोली जिल्ह्यातील
वसमत  पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याचा राग जावयाला आला व जावयाने रागाच्या भरात आपल्या सासूला दगडावर डोके आपटून खून केल्याची खळबळ घटना वसमत मध्ये सोमवारी भल्या पहाटे घडली. पत्नीचा विरह असह्य झाल्याने वैतागलेल्या जावयाच्या हातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी जावयाच्या विरोधात खुनाचा गुन्हा वसमत शहर पोलीसांनी नोंदवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वसमत येथील झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या शेवंताबाई वंजे यांची मुलगी कविता हिचा विवाह टाकळीभान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील बाळासाहेब शिनगारे यांच्यासोबत झाला होता. या दांपत्याला एक पाच वर्षाची मुलगी ही आहे. मात्र कविताला पती कडून सतत मारहाण व्हायची त्यामुळे कविता आपल्या आईकडे राहावयास आली होती. पत्नी निघून गेल्यानंतर पत्नीचा विरह बाबासाहेब शिनगारे असह्य व्हायचा. त्यामुळे पत्नी
माहेरी गेल्या नंतरही पती बाबासाहेब शिनगारे हा सासरवाडीला यायचा पतीच्या त्रासाला पत्नी कविता कंटाळलेली होती. पती येणार आहे असे समजल्यानंतर कविता आपल्या बहिणीकडे निघून गेली होती. रविवारी बाबासाहेब शिनगारे वसमत येथे आला मात्र त्याला पत्नी कविता दिसली नाही त्यामुळे त्याने सासू शेवंताबाई म्हणजे सोबत वाद घालण्यात सुरुवात केली. माझ्या पत्नीला कोठे पाठवलेस, तिला नांदायला का पाठवत नाही म्हणून वाद सुरू झाला. ८ मे सोमवार रोजी   साडेचारच्या सुमारास बाबासाहेब शिंनगारेने चक्क सासू शेवंताबाई ला मारहाण करण्यास सुरूवात केली. रागाच्या भरात त्याने सासूचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटले व लाथा बुक्क्याने मारहाण केली या मारहाणीत शेवंताबाई वंजे गंभीर जखमी झाल्या त्यांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात हालविण्यात आले; मात्र तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्या मयत झाल्याचे जाहीर केले. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या 

प्रकरणी मयताची मुलगी व आरोपीची पत्नी कविता शिनगारेच्या तक्रारीवरून आरोपी बाबासाहेब सिताराम शिनगारे वय ४५ राहणार टाकळीमान जिल्हा अहमदनगरच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकांनद वाखारे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचरण करण्यात आले आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. खुनाचा गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या आदेशाने
सहाय्यक पोलीस निरीक्षक भिंगारे करत आहेत. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने