पोलिस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त तलाठ्याला लुटले औंढा नागनाथ येथील घटना : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
मंगळवार 09मे2023
हिंगोली : आम्ही पोलिस आहोत, तुमच्याजवळील सोन्याचा हॉलमार्क चेक करायचा, असे अशी बतावणी करून, एका सेवानिवृत्त तलाठ्याची सोन्याची चैन व अंगठी लुटल्याची घटना औंढा नागनाथ शहरात ८ मे रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात दोघा जणांवर गुन्हा दाखल
करण्यात आला
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना पोलीस निरीक्षण विश्वनाथ झुंजारे
औंढा नागनाथ
शहरातील
इंदिरानगर भागातील सेवानिवृत्त तलाठी मनोहर लक्ष्मण पायघन ८ मे रोजी सकाळी ११:३०च्या सुमारास औंढा येथील रोडवरून जात होते. त्यावेळी त्यांच्याजवळ दोघे जण आले आणि आम्ही पोलिस असल्याचे बतावणी करीत, तुमच्याजवळील सोन्याचा हॉलमार्क चेक करायचा आहेत, असे ते म्हणाले. त्यावेळी त्या दोघांनी मनोहर पायघन यांच्याकडील ४५ हजारांची १५ ग्रॅम सोन्याची चैन व
१८ हजार रुपयांची ६ ग्रॅमची अंगठी असा एकूण ६३ हजारांचा माल लंपास केला. पायघन यांना काही कळण्याच्या आतच ते दोघे पसारही झाले.
आपल्याला लुटल्याचे लक्षात आल्यानंतर, मनोहर पायघन यांनी औंढा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून दोघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आला.
पुढील
तपास पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी.जी.आवडे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा