कनेरगाव नाका येथे गुटखा पकडला, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही.

कनेरगाव नाका येथे  गुटखा पकडला, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
. महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
03 जून 2023
दिनांक 2/ 6/ 2023 रोजी कनेरगाव नाका येथे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली च्या पथकाने छापा मारून 20 हजार रुपयाचा गुटखा पकडला असून गुटखा बाळगणारा आरोपी नामे संतोष दिगंबर माहोरे राहणार कनेरगाव नाका ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गोरेगाव येथे कलम 328 भादवी व इतर कलमाने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक श्री पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. घेवारे, पोलीस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने