कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरूध्द वाहतूक पोलिसाची मोठी कारवाई

 कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरूध्द वाहतूक पोलिसाची  मोठी कारवाई

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
13 नोव्हेंबर 2023
 हिंगोली  शहर वाहतुक शाखा, हिंगोली येथील पोलीस अंमलदार यांनी केलेल्या कारवाई करण्यात आलेल्या केसेसची माहिती.

हिंगोली शहरामध्ये 6 ते13नोव्हेंबर  आठवडयात हिंगोली शहरात वाहतुक शाखेच्या वतीने  मोटार वाहन कायद्याचे उल्लंघण करणाऱ्या चालकाविरूध्द प्रभावी कार्यवाही करत, वाहन चालवितांनी मोबाईल चा वापर करणान्या वाहन चालकांविरूध्द ४० केसेस करून ४०,००० रु दंड, तसेच ट्रिपल सिट १४५ केसेस करून १,४५००० रु दंड इत्तर कलमान्वये १४६ केसेस करून १००७५० रु दंड असे एकुण ३.३१ वाहनांवर २,८५,७५०/- रूपये  अक्षरी दोन लाख पंच्याशी हजार सातशे रू. इतका दंड आकारण्यात आला आहे. तसेच वाहनावर पोलीस तसेच पत्रकार किंवा प्रेस नांव टाकूण वाहन चालविणारे वाहनावर कार्यवाही करण्यात येत आहे शहरांतील वाहन चालक, फळविकेत तसेच रोडवर गाडे लावून दुकाणदारी करणान्यांविरूध्द कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच अॅटो व इत्तर प्रवाशी वाहतुक करणारे चालकांना गणवेष परीधान करण्याचे शक्ती करण्यात आली आहे.

जिल्हयातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकान मालक यांनी त्यांचे दुकाणासमोर रोडवर लावलेले पोस्टर्स / बॅनर्स/ बोर्ड्स काढुन घेण्यात यावे अन्यथा त्यांचेवर प्रचलीत कायद्यानुसार कायदेशेर कारवाई करण्यात येईल तसेच रोडवरील हातगाडे/ फेरीवाले यांनी त्यांचे ताब्यातील गाडे रोडवर उभे केल्यास तसेच तिनचाकी, चारचाकी व इतर वाहने रस्त्याचे मधोमध उभे आढळुन आल्यास भा.दं.वि. कलम २८३ प्रमाणे करवाई करण्यात येईल. तसेच सर्व व्यापारी / दुकाण मालक यांनी शहरातील मुख्य चौकातील रस्त्यावर त्यांचे दुकाणाचे समोर रोडच्या मधोमध लावलेले बॅनर्स/ पोस्टर्स ई. काढुन टाकावे अन्यथा आपले विरूध्द कायदेशेर कारवाई करण्यात येईल.

बुलेट वाहन व इतर रेसर बाईक चे सायलेन्सर मध्ये बदल, कर्नकका हॉर्न व इतर केलेला बदल काढुन

टाकावे अन्यथा आपले वाहन डिटेन करून मोठया प्रमाणात दंड आकारला जाईल यांची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.

त्याचप्रामणे ज्या वाहनांवर मोटार कायद्याचे उल्लंघन केल्याने दंड करण्यात आला आहे असा वाहन चालकांनी दंड

झालेनंतर १५ दिवसाचे आत रितसर दंड भरून दंड भल्याची पावती घेणे अन्यथा मुदत संपलेनंतर आपले वाहन डिटेन
करण्यात येईल.

वरील कार्यवाही मा. श्री. जी. श्रीधर पोलीस अधिक्षक, हिंगोली, मा. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखा, हिंगोली पो. नि. श्री गुरमे व वाहतुक शाखेचे सर्व पोलीस अंमलदार यांनी कार्यवाही केली.

वाहतुक शाखेतर्फे हिंगोली जिल्हयातील सर्व वाहन चालकांना आव्हाण करण्यात येते की मोटार वाहन कायद्याचे पालन करावे तसेच हिंगोली शहरामध्ये नो पार्किंग झोन मध्ये वाहन उभे करू नये, विरूध्द दिशेने वाहन चालवु नये, जे वाहन चालक मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील त्यांचे वर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची सर्व जनतेने नोंद घ्यावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने