दिवाळीत दामिनी पथकाची टवाळखोरांवर बेधडक कारवाई

दिवाळीत दामिनी पथकाची  टवाळखोरांवर बेधडक कारवाई

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
14 नोव्हेंबर 2023 
 हिंगोलीत गर्दीच्या ठिकाणी
टवाळखोरी करणाऱ्या ३ जणांवर दामिनी पथकाने कारवाई केली. पथकाने मागील सात दिवसांत ४९ ठिकाणी भेटी देऊन महिला, मुलींना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

पोलिस शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे, बाजारपेठ, उद्यान, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी महिला, मुली व लहान मुलांबाबत छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा, त्यांना वेळेत पोलिसांची मदत मिळावी, या टवाळखोरांवर वचक बसावा, या उद्देशाने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दामिनी पथक कार्यान्वित केले आहे. त्यानुसार हे पथक गर्दीच्या ठिकाणी भेटी देत असून महिला, मुलींना सुरक्षितेबाबत मार्गदर्शन करीत आहे. पथकाने मागील सात दिवसांत
डायल ११२ वर संपर्क साधावा
अडचणीच्या वेळी महिला, मुली, लहान बालकांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने हेल्पलाइन सुरु केली आहे.
८००७०००४९३ किंवा डायल ११२ यावर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत पोलिसांची मदत मिळणार आहे.
४९ ठिकाणी भेटी दिल्या. यात ३ जण टवाळखोरी करताना आढळून आल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विशाखा धुळे, पोलिस अंमलदार सरनाईक, आरती साळवे, अर्चना नखाते, चंद्रशेखर देशमुख आदींच्या पथकाने केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने