हाउसिंग फायनान्स कार्पोरेशन मुंबईच्या संचालक पदी दिलीप चव्हाण यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड

14 डिसेंबर 2023
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
हिंगोली महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनच्या संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण हे पाचव्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत.

महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन मुंबईच्या संचालक मंडळासाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडली. मराठवाडा विभागातून पाच संचालक निवडुन द्यावयाचे होते. पाच जागेसाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा १३ डिसेंबर शेवटचा दिवस होता. इतर चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे
जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, नांदेडचे हरीहर भोसीकर, छत्रपती संभाजी नगरचे सुनिल जाधव, बीडचे जयसिंग पंडीत तर परभणीचे रवि पतंगे हे बिनविरोध निवडून आले. दिलीप चव्हाण हे २००० पासून या महामंडळाच्या संचालक पदावर काम 'पाहत आहेत. पाचव्यांदा त्यांची या प्र महामंडळावर बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जयंत पाटील, प्रविण दरेकर, राजेश टोपे, अंकूश काकडे, प्रकाश दरेकर, सुभाष झाम्बड, व्ही.बी. पाटील यांनी प्रयत्न केले. चव्हाण यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Post a Comment

أحدث أقدم