आमली पदार्थ (गांजा) पकडलेल्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजुर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
14 डिसेंबर 2023
मुद्देमाल 1.45.500/- रुपयाचे गांजा पकडलेल्या प्रकरणातील आरोपीची जामीन मंजुर
दि. 16/09/2023 रोजी स.पो.उ.नि. श्री. शेख खुदुस शेख लाल यांनी मौजे कोळसा, ता. सेनगांव, जि. हिंगोली येथे अवैध गांजाची शेती करत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरुन सदरील ठिकाणी जाऊन छापा मारला आणि एकुण अंदाजे 1,45,500/- रुपये किंमतीचे तब्बल 29 किलो 100 ग्रामचे गांजाचे झाडे जप्ती करुन आरोपी जगन्नाथ निवृती वाव्हाळ यांना अटक केली होती आणि त्यांच्या विरोधात गांजाची शेती करण्याच्या आरोपातून पोलीस स्टेशन सेनगाव येथे गु.र.नं. 327/2023 कलम 8 (ब). 20(2) (क) एनडीपीएस अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तरी आरोपी जगन्नाथ निवृती वाव्हळ याने अॅड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. सत्र न्यायालय हिंगोली येथे जामीनासाठी अर्ज केला असता वि. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज दि. 05/12/2023 रोजी मंजुर केला आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.मा. श्रीमती एस. एन. माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुण आरोपीचा जामीन मंजुर केला. आरोपी पक्षातर्फे जेष्ठ अॅड. श्री. सतीष आबाराव देशमुख, अॅड. सुनिता सतीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अजय उर्फ बंटी देशमुख यांनी युक्तीवाद केला त्यांना अॅड. शरद देशमुख, अॅड. शुभम देशमुख, अॅड. राहुल देशमुख, अॅड. विराज देशमुख, अॅड. रजत देशमुख, अॅड. योगेश पाटील, अॅड. अविनाश राठोड, अॅड. प्रकाश मगरे, अॅड. आनंद खिल्लारी, अॅड. मुदस्सीर रहीम, अॅड. सुमित सातव, अॅड. श्रध्दा जैस्वाल, अॅड. आकाश चव्हाण, अॅड. लखन पठाडे, अॅड. शुभम मुदिराज, अॅड. गजानन घुगे यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा