सोयाबीन चोरणारी टोळी शिवसाब घेवारे यांच्या पथकाची कारवाई

सोयाबीन चोरणारी टोळी जेरबंद
शिवसाब घेवारे यांच्या पथकाची कारवाई

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
15 डिसेंबर 2023
कळमनुरी तालुक्यात मागील
काही महिन्यापासून सोयाबीन चोरीचे गुन्हे घडत होते. याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रारी दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अट्टल गुन्हेगाराची टोळी जेरबंद केली
 असून सोयाबीन चोरीचे सात गुन्हे उघड करण्यात आले आहेत. या पाच आरोपीकडून १ लाख ५० हजाराचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर
यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सपोनि शिवसांब घेवारे आणि त्यांच्या तपास पथकाने नमुद घटनास्थळी व परीसरात भेटी देवुन तंत्रशुध्द तपास पध्दती व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने माहीती घेत सदरचे गुन्हे आरोपी युवराजसिंग देवासिंग बावरी, अक्षय रमेश पवार, प्रेमसिंग सतनामसिंग टाक, राजेश उर्फ सोन्या बंडु झुंबडे, सर्व रा. इंदिरानगर, कळमनुरी व ५) कृष्णा श्ररत आसोले रा. आसोलवाडी, ता. कळमनुरी यांनी मिळुन केले बाबत 
सोयाबीन चोरीचे ७ गुन्हे उघड
पाच आरोपीकडून १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त
माहीती मिळाली. त्यावरून स्थागुशाच्या पथकाने नमुद आरोपींना सापळा रचुन शितीफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन तपास केला असता त्यांनी जिल्हयात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत मोटारपंप व स्टाटर चोरीचे गुन्हे केल्याची कबुले दिलो.

आरोपीकडुन तपासात पोलीस कळपनुरी हद्दीतील सोयाबोन चोरोचे ०७ गुन्हे उघड करण्यात आले असुन तपासात त्यांचेकडून चोरून नेलेले सोयाबीनचे कट्टे एकूण ३० कट्टे 
७५ हजार रुपये व मोबाईल असा एकुण इट १ लाख ५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक स्थागुशा विकास पाटील यांचे मार्गदर्शशाखाली विट सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजुसिंग ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले यांनी कारवाई सहभाग घेतला होता

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने