अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरोदर राहिली नाशिकहून गुन्हा वर्ग केला कळमनुरीत पोलिसात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरोदर राहिली नाशिकहून गुन्हा वर्ग केला कळमनुरीत पोलिसात 

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
16 डिसेंबर 2023
हिंगोली : औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील एका अल्पवयीन मुलीवर ४५ वर्षीय इसमाने अतिप्रसंग केल्याने ती गरोदर राहिली. यावरून त्याच्याविरुद्ध कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही मुलगी नाशिक जिल्ह्यातील एका इंग्रजी शाळेत शिकायला होती. परीक्षा संपल्यावर ती गावी आली होती. तेव्हा १ एप्रिल २०२३ ते ३० एप्रिल २०२३ या काळात ती तिच्या राहत्या घरी असताना या इसमाने पाणी मागण्याच्या बहाण्याने तेथे प्रवेश केला. ती पाणी आणण्यासाठी घरात
गेली असता तिच्या मागे घरात जाऊन दाराची कडी लावून घेत जबरदस्तीने अतिप्रसंग केला, याबाबतचा प्रकार ती शाळेत गेल्यानंतर उघडकीस आला. यावरून नाशिक ग्रामीण पोलिसांत आधी गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण झिरोने कळमनुरी पोलिसांत वर्ग करण्यात आले आहे. याबाबत पिंपळदरी येथील गुबा बेले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने