धाक दाखवून महिलेचे दागिने काढून घेतले; पोलिसांनी दरोडेखोरास बेड्या ठोकल्या
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
17 डिसेंबर 2023
हिंगोली : येथील कमलानगरातील एका महिलेस धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने काढून घेतल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरास बेड्या ठोकत त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.
शहरातील कमलानगरातील ५८ वर्षीय महिलेच्या घरात चोरट्याने प्रवेश केला होता. त्यानंतर धाक दाखवून कानातल्या काड्या, सोन्याची पोत, हातातील चांदीचे काकण, मोबाइल बळजबरीने काढून घेत असा एकूण ८६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. मात्र चोरट्याने पीडित महिलेस जिवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित महिला तक्रार देण्यास धजावत नव्हती. पोलिसांनी सुरक्षिततेबाबत विश्वास दिल्याने याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, यातील लुटारूचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या, त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने लुटारूचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, या
लुटारूवर यापूर्वीही गुन्हे दाखल दरम्यान, आरोपी नागोराव श्रीरामे याने यापूर्वी नर्सी पोलिस ठाणे हद्दीतील
पहेणी व घोटा देवी येथील महिलांच्या अंगावरील दागिने जबरीने काढून घेतल्याप्रकरणी तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. मुलींना पोलिस भरतीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचेही गुन्हे दाखल आहेत. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसाय घेवारे, पोलिस अमलदार राजूसिंग ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाजे, नरेंद सावळे, प्रशांत वाघमारे, इरफान पठाण यांच्या पथकाने केली.
घटनेतील लुटारू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नागोराव सुखदेव श्रीरामे (रा. हनकदरी ता. सेनगाव) असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल, तलवार असा एकूण ८६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
टिप्पणी पोस्ट करा