कुरुंदा पोलिस ठाणे संघाने विजेतेपद पटकावलेपोलिस अधीक्षक कार्यालय संघ उपविजेता

कुरुंदा पोलिस ठाणे संघाने विजेतेपद पटकावले
पोलिस अधीक्षक कार्यालय संघ उपविजेता

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
18 डिसेंबर २०२३
 हिंगोली : येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर १७ डिसेंबर रोजी कौमी एकता क्रिकेट चषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. यात पोलिस अधीक्षक कार्यालय संघाचा ५३ धावांनी पराभव करीत कुरुंदा पोलिस ठाणे संघाने विजेतेपद पटकावले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून पोलिस दलाच्या वतीने कौमी एकता क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा अंतिम सामना १७ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय व कुरुंदा पोलिस ठाणे यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कुरुंदा संघाने १५ षटकात १९८ धावांचा डोंगर उभारला. यात अमर नरवाडे ९६ तर शेख शफी शेख युसूफ यांनी ५९ धावा केल्या.

पोलिस अधीक्षक कार्यालय संघाने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संघ सर्व गडी बाद १४६ धावांत गारद झाला, यात कुरूंदा संघाने ५३ धावांनी विजय मिळवला.
विजेत्या, उपविजेत्या संघास पारितोषिकाचे वितरण
 स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक कार्यालय, वाहतूक शाखा, पोलिस मुख्यालय असे एकूण १६ संघांनी सहभाग नोंदविला होता. यात कुरुंदा संघ विजेता तर पोलिस अधीक्षक कार्यालय संघ उपविजेता ठरला, विजेत्या संघास जिल्हाधिकारी जितेंद पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देंने, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीत

पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
 यावेळी अमर नरवाडे
(सामनावीर), नरेंद्र गाँड (उत्कृष्ट फलंदाज), परवेज शेख (उत्कृष्ट गोलंदाज), विक्की कुंदनार्नी (उत्कृष्ट विकेटकिपर) यांचाही गौरव करण्यात आला. पोलिस निरीक्षक विकास पाटील, नरेंट पाडळकर, गणेश राहिरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, शिवसांब घेवारे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم