पहिली पत्नी असताना दुसरीशी घरोबा पोलीस खात्यातून बडतर्फ
पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी काढले आदेश
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
07 डिसेंबर 2023
हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला पहिली पत्नी असतांनाही दुसरे लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात सविस्तर चौकशी नंतर पोलिस कर्मचारी इमरानखान बाबुखान पठाण (बक्कल नंबर ४६०) यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक जी, श्रीधर यांनी ६ डिसेंबर बुधवारी रोजी काढले आहेत.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या
माहितीनुसार, हिंगोली येथील रहिवासी असलेला इमरानखान बाबुखान पठाण हे सन २०१२ मध्ये जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. त्यानंतर त्यांचे रितीरीवाजाप्रमाणे प्रथम लग्न झालेले होते. मागील काही दिवसांपासून ते पोलीस स्टेशन औंढा येथे नेमणुकीस होते. यावेळी त्यांनी पहिली पत्नी जिवंत असताना हिंगोली येथे दुसरे लग्न केले. त्यावरून त्यांच्या पहिल्या पत्नीने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस कर्मचारी इमरानखान यास एक महिन्यापुर्वी
निलंबीत करून त्यास मुख्यालयात संलग्न केले होते, तसेच या प्रकरणात सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांना दिले होते. त्यावरून अप्पर पोलिस अधिक्षक पाटील यांनी सविस्तर चौकशी केली. यामध्ये कर्मचारी इमरानखान याने अनधिकृतपणे दुसरे लग्न केल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतचा अहवाल पोलिस अधिक्षकांकडे सादर केला होता. या अहवालानंतर कर्मचारी इमरानखान यास बडतर्फ करण्यात आले आहे
टिप्पणी पोस्ट करा