मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेता येणार नाहीत!गृहमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेता येणार नाहीत!
गृहमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
9 डिसेंबर 2023
 १ सप्टेंबरला
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; परंतु, त्यावेळी काही मराठा आंदोलकांवर गुन्ह्याची नोंद • करण्यात आली होती. या आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात
होती
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी -देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील लेखी उत्तर सभागृहात सादर केले आहे. तसेच, निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची माहिती दिली.

यावेळी विधानसभेत या प्रकरणाचे लेखी उत्तर सादर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेमध्ये जवळपास ५० आंदोलक जखमी झाले असून ७९ पोलीस जखमी आहेत. त्यामुळे या घटनेत सर्वाधिक पोलीस
आली आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासनही मंत्र्यांकडून मनोज जरांगे यांना देण्यात आले, पण या प्रकरणावरून आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. 
जखमी झाल्याचे फडणवीस यांच्या निवेदनावरून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केल्याचेही या लेखी उत्तरातून सांगण्यात आले आहे. ज्यामुळे आता या संदर्भात फडणवीस ने यांनी कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिल्याचे या लेखी उत्तराच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. तर, सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची व प्रक्रिया केली जाईल, असे या लेखी निवेदनातून सांगण्यात आले आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरवालीतील मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यास या लेखी उत्तराच्या माध्यमातून असमर्थता दर्शविली आहे. तर त्यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे देत एक प्रकारे पोलिसांची पाठराखण केल्याचेच दिसून येत आहे. ज्यामुळे आता या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच त्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशीही मागणी केलेली आहे, पण आजपर्यंत त्यांना सरकारमधील मंत्र्यांकडून केवळ आश्वासनच देण्यात आले आहे; परंतु, आता स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याने जरांगे पाटील याबाबत काय मत व्यक्त करतात? यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने