तीन गुन्हेगारांना केले हिंगोली जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार

तीन गुन्हेगारांना केले हिंगोली जिल्ह्यातून  वर्षभरासाठी हद्दपार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22 डिसेंबर 2023
हिंगोली : वसमत शहर पोलिस
 ठाण्याच्या हद्दीत सतत गुन्हे करणाऱ्या तीन जणांना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

वसमत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुऱ्यासिंग चतुरसिंग चव्हाण (वय ६२), गुलाबसिंग भुऱ्यासिंग चव्हाण (वय ३०), भारतसिंग भुऱ्यासिंग चव्हाण (वय २५), रा. रेल्वेस्टेशन रोड, वसमत यांची दहशत वाढली होती. त्यांच्यावर
मालाविरुद्धचे व शरीराविरुद्धचे १० गुन्हे दाखल आहेत. तर दोन अदखलपात्र गुन्हेही आहेत. सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत. समज देऊनही त्यांच्या वर्तनात कोणताच बदल होत नसल्याने पुन्हा ते अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करण्याचा धोका आहे. त्यामुळे वसमत शहर पोलिस ठाण्याचे फौजदार एस. बी. भोसले यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली.

Post a Comment

أحدث أقدم