गुन्ह्यातील २६ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल फिर्यादीस केला परत
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
31 डिसेंबर 2023
हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यामधील मुद्देमाल जप्त केल्या नंतर तो फिर्यादीस सन्मानपुर्वक परत दिला जातो. ज्यामध्ये डिसेंबर महिन्यात दोन गुन्ह्यातील २६ लाख ६५ हजार रुपयाचा मुद्देमाल परत देण्यात आला.
जिल्ह्यात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीकडुन जप्त केला जातो, जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी ही संकल्पना राबविली असून प्रत्येक महिन्यामध्ये अनेक फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल सन्मानपुर्वक परत दिला जातो. या निमित्त ३० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील दोन गुन्ह्यामधील नगदी ७७ हजार ५०० रुपये व २१ लाख ६० हजार रुपयाचे १९ वाहने ३ लाख रुपयाचे २३ मोबाईल असा एकुण २६ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपुर्वक परत देण्यात आला. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या
आतापर्यंत ३ कोटीचा मुद्देमाल केला परत अनेक गुन्ह्यामध्ये आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपुर्वक दिला जातो. जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी राबविलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ८ हजार ८९२ रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपुर्वक परत करण्यात आला आहे.
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सिवसाब घेवारे. राजेश मलपिलू
सुनिल अंभोरे व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी मोहरील यांनी केली आहे.
إرسال تعليق