गांजा तस्करी करणाऱ्या नांदेड येथील आरोपीस जामीन मंजुर
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
18 डिसेंबर 2023
आरोपी नामे शेख युनूस शेख सलीम रा. नांदेड ता.जि.नांदेड यांच्यावर गांजा तस्करी करायचा प्रयत्न करण्याचा आरोपावरुन पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुरनं. 878/2023 कलम 34 भांदवी व 20(b)(ii), 8(c) NDPS अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि. 12. डिसेंबर रोजी मा.न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.आरीफखान पठाण, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा