सूनेवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी सासरा व भायावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
26 डिसेंबर 2023
हिंगोली, तालुक्यातील बासंबा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या खेर्डा येथील 23 वर्षे महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मंगळवारी सासरा व भाया या दोघावर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील पिडीतेने मंगळवारी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यानुसार बाबासाहेब दतराव गडदे, कपील बाबासाहेब गडदे यांनी संगणमत करुन मंगळवारी सकाळी पीडीतेचा सासरा बाबासाहेब गडदे यांने तुझ्या नवऱ्याचा अपघात झाल्याने तो कोणाच्या कामाचा राहीला नाही आता तु मलाच नवरा समज असे म्हणून अत्याचार केला.
भाया कपील गडदे याने देखील जबरदस्तीने अत्याचार केला व जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद दिली त्यानुसार पीडीतेच्या फिर्यानुसार बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक निरीक्षक विलास चवळी सहायक पोलीस उपनिरीक्षक नानाराव पोले नामदेव हाके त्यांच्या पथकाने तात्काळ दोन्ही आरोपीला अटक केली आहे
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करत आहेत
टिप्पणी पोस्ट करा