भिमशाहीर साहेबराव येरेकर यांचा मंगळवारी हिंगोलीत भिमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम

भिमशाहीर साहेबराव येरेकर यांचा मंगळवारी हिंगोलीत  भिमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
13 जानेवारी 2024 

हिंगोली शहरातील  गांधी चौक शेजारील संविधान कॉर्नर, संविधान स्तंभ येथे भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त ५०० शुरवीर भिमसैनिकांना मानवंदना, अभिवादन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त १६ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजे पर्यंत महाराष्ट्रातील भीमशाहीर प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांचा भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हिंगोली येथे भीमा कोरेगाव दिनानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
नामविस्तार दिनानिमित्त १६ जानेवारी रोजी मानवंदना व अभिवादन सांस्कृर्गीतिक कार्यक्रम भिमशाहिर प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांचा आयोजित करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यासह शहरातील परिवर्तनवादी आंबेडकरवादी जनतेने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्यआयोजक बंडु नरवाडे, मुनीर पठाण आडगावकर 
अक्षय इंगोले, अॅ. अभिजीत खंदारे,  प्रकाश पठाडे, संजय वाढवे, संतोष सावंत, अविनाश इंगोले आदींनी केले आहे. तसेच भीमशाहीर साहेबराव येरेकर यांच्या पोस्टराचे लॉन्च केले आहे. या मराठवाडा व विदर्भातील सर्वआंबेडकरी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने