डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलच्या टीमचे केले कौतुक

डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी  लक्ष्मी लाईफ केअर  हॉस्पिटलच्या टीमचे केले कौतुक 
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
12 जानेवारी 2024
हिंगोली आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे ११ जानेवारी गुरुवार रोजी हिंगोलीत आले असता लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी कॅथलॅब, डायलेसीस, युरॉलॉजी हे युनिट सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे जिल्ह्यातील मिशनचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी दाखल झाले होते. यावेळी लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल येथे भेट देऊन हितगुज साधले. यावेळी हॉस्पिटलमधील अँजीओप्लास्टी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. अखिल
अग्रवाल यांनी रुग्णालयातर्फे डॉ. शेटे यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. पंजाब शेळके, डॉ. मंगेश मुंढे, डॉ. संदिप इंगळे पाटील, डॉ. मयुर अग्रवाल, डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. विजया अग्रवाल, डॉ. महेंद्र मोरे, डॉ. रोहन राठोड, प्रविण भट्ट, माधव सपाटे, शहर अभियंता अशोक अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने