सुमित कांबळे यांची पुरस्कारासाठी निवड पुणे येथे 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे होणार वितरण

सुमित कांबळे यांची पुरस्कारासाठी निवड 
 पुणे येथे 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे होणार वितरण

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
06फेब्रुवारी 2024
हिंगोली (प्रतिनिधी):
मातंग साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने यावर्षी दिल्या जाणाऱ्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे  राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कारासाठी हिंगोली येथील राजस बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची निवड करण्यात आली आहे. साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना दरवर्षी पुरस्कार दिल्या जात आहे
. या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यभरातून सेवाभावी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.
सुमित कांबळे यांचा सत्कार करताना
शिवजयंतीच्या अध्यक्ष ॲड रमेश शिंदे पत्रकार सुधाकर वाढवे पत्रकार श्याम सोळंके पत्रकार विजय गुडेकर  ॲड स्वप्निल इंगळे 
पवन जाधव इत्यादी उपस्थित होते
 यामध्ये हिंगोली येथील राजस सेवाभावी संस्थेच्या वतीने ही प्रस्ताव पाठविण्यात आला होता. नुकताच परिषदेच्या वतीने पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये हिंगोली येथील संस्थेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  या पुरस्काराचे वितरण 11 फेब्रुवारी रोजी पुणे येथे होत असलेल्या दुसऱ्या मातंग ऋषी साहित्य संमेलनामध्ये पुरस्काराचे वितरण होणार आहे . पुरस्कार स्वीकारण्यासाठी राजस बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव सुमित कांबळे आणि त्यांचे सहकारी पुणे येथे होत असलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून पुरस्कार स्वीकार करणार आहेत.  राजस सेवाभावी संस्थेची पुरस्काराला निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव सुमित कांबळे सहित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केल्या जात आहे .

Post a Comment

أحدث أقدم