देशात ३ कोटीपेक्षा अधिक अनाथ बालके हे दुर्देव ः स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापक श्रेया भरतीया, हिंगोलीत कार्यक्रम, सुजान पालकांनी पुढे येण्याचे आवाहन
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
02 फेब्रुवारी 2024
जगात अनाथ मुलांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून तब्बल ३ कोटी पेक्षा अधिक बालके अनाथ आहेत हे आपले दुर्देव आहे. या मुलांना प्रतिपालकत्व योजनेच्या माध्यमातून प्रेम, माया, जिव्हाळा देण्यासाठी सुजान पालकांनी पुढे यावे असे आवाहन स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापक श्रेया भारतीय यांनी गुरुवारी ता. १ येथे केले.
हिंगोली येथील नारायण नगर भागातील उद्यानामध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपाठीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, मिरा कदम, रामदास पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, डॉ.अखील अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्रेया भारतीय पुढे म्हणाल्या की, देशात सध्याच्या स्थितीत ३ कोटी पेक्षा अधिक मुले अनाथ आहेत. दररोज सुमारे १० हजार बालके जन्मघेऊन अनाथ होतात. सध्याच्या स्थितीत ३.५० लाख बालके बालगृहात असून त्यांचे बालगृहातील वाढते प्रमाण दुर्देवी अाहे. देशातील पालकत्व सुजान असलेल तरी अनेकांनी अनाथ मुलांकडे दुर्लक्ष केले आहेत.
सध्या राज्यात ६०३ बालगृह चालत असून यामध्ये ५५१ खाजगी संस्थेचे तर ५२ शासकिय आहेत. या ठिकाणी असलेल्या अनाथ मुलांना प्रतिपालकत्व योजनेचा लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या बालगृहातील बालकांना मायेची व मजबूत आधाराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय दुर्धर आजारी असलेल्या पालकांच्या मुलांनाही प्रतिपालकत्व योजनेचा लाभ देता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अनाथ मुलांना प्रेम, जिव्हाळा, माया देणे तसेच या बालकांना प्रतिपालकत्व देऊन त्यांना आधार देण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनानेही फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रतिपालकत्व योजना हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमध्ये प्रशासनाने वेळप्रसंगी निकषामध्ये थोडी शिथीलता आणल्यास राज्यात अनाथ मुलांच्या बाबतीच चांगला विचार होऊ शकतो असे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अनाथ मुलांसाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांना प्रतिपालकत्वाच्या माध्यमातून आनंद द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक वसंत भट्ट यांनी केले. सुत्रसंचालन महेश पेंडके यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक अग्रवाल, ॲड. मनिष साकळे, वसंत भट्ट, डॉ. मयुर अग्रवाल, गुड्डू भट्ट, सौरभ काप्रतवार यांनी पुढाकार घेतला.
लक्ष्मी लाईफ केअर मधील सुविधांचे केले कौतूक
हिंगोली सारख्या लहानशा शहरामध्ये डॉ. अखील अग्रवाल, डॉ. मयुर अग्रवाल यांनी लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलच्या माध्यमातून ॲन्जीओग्राफी, ॲन्जीओप्लास्टी, डायलीसीस सह अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या बद्दल त्यांचे कौतूक केले.
टिप्पणी पोस्ट करा