दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
16 फेब्रुवारी 2024 
हिंगोली वसमत ते नांदेड रस्त्यावर माळवटाजवळील पुलाजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांचा डाव पोलिसांनी उधळला. यावेळी पोलिसांना पाहुन तिघांनी पलायन केले तर दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडुन १ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त करून पाच जणार वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व त्यांचे पथक १४ फेब्रुवारी रोजी वसमत परिसरात पेट्रोलिंग करीत असताना काही संशयीत व्यक्ती दबा धरून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. माळवटा जवळील पुलाजवळ पाच जण अंधाराचा फायदा घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांना पाहुन तिघांनी पलायन केले.
 मात्र आरोपी विजय उर्फ बंटी
चांदु आढाव, रामदास गजानन
 माळवटा फाट्याजवळ दबा धरून बसलेल्या पाच जणांचा डाव उधळला; तिघे फरार, दोघांना घेतले ताब्यात आरोपीकडून १ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त वसमत ग्रामीण पोलिसात पाच जणावर गुन्हा दाखल

पवार रा. कामठा ता. अर्धापूर जि. नांदेड हे दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारी तलवार, लोखंडी रॉड, मिरची पुड, बॅटरी, दोरी आणि दोन मोटरसायकल असा एकुण १ लाख ७० हजार ५५० रुपयाचा माल जप्त केला. घटनास्थळावरून पळून गेलेले त्यांचे साथीदार श्रीकांत प्रल्हाद कसबे रा. कामठा, वैभव लक्ष्मण सरोदे, भैय्यासाहेब कोलते रा. पांगरागाव ता. मुदखेड जि. नांदेड अशा पाच जणावर वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे, नागरे, दिक पाटील यांनी केली.

Post a Comment

أحدث أقدم