शिवजयंती महोत्सव निमित्ताने हिंगोली कविसंमेलन संपन्न
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
18 फेब्रुवारी 2024
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली च्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8 वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी अॅड.रमेश शिंदे हे तर उद्घाटक म्हणून सुधाकर जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी हिंगोली. तर प्रमुख पाहुणे म्हणून. गणेश वाघ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, मिनाक्षी पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगोली. नरेंद्र पाडळकर पोलिस निरीक्षक हिंगोली, पवन जाधव, सचिव सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली, सुमित कांबळे, खंडेराव सरनाईक, कवि कलानंद जाधव, ढोकर पाटील मामा, कल्याण देशमुख, पप्पू चव्हाण, अॅड.अमोल जाधव,अॅड.जया करडेकर, देशमुख, ज्ञानेश्वर लोंढे,कवि दिलीप धामणे, यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलानंद जाधव यांनी केले, तर सुत्रसंचलन कवियत्री सौ सिंधूताई दहिफळे यांनी केले.
यावेळी गणेश वाघ यांनी असे सांगितले की. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्ताने सामाजिक, धार्मिक आर्थिक, बौद्धिक, शारीरिक खेळ विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा एकमेव जिल्हा असेल कि शिवजयंती महोत्सव विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. साहित्यिक क्षेत्रात नवनवीन कवि लेखकांना संधी उपलब्ध करून देत आहेत. हे उल्लेखनीय कार्य शिवजयंती समितीच्या वतीने केले जात आहे.
कविसंमेलनाची सुरूवात कवियत्री सौ सिंधूताई दहिफळे यांच्या कवितेने झाली. तेहतीस टक्के आरक्षणाचा का करता बोभाटा,
काबीज केलं भूदल,जलदल
,वायू सेनेत ती गेली,
मुर्मु इंदिरा,प्रतिभा सारखी,
,महान नारी बघ झाली,
कर्तुत्वावर तिने मिळविला इथे विजश्री मोठा,
राष्ट्र घडवण्यात नारी शक्तीचा समान आहे वाटा.
यानंतर कवी दिलीप धामणे यांनी जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुज अंबे करून प्रारंभे... हा कर्तबगार स्त्रियांवरील स्वरचित पोवाडा सादर केला.
कवी रतन आडे यांनी आपली कविता ""शास्वत " मध्ये सांगितले की.
माय नसते देखनी
कुरुप नसते माय
बिल्लोरी जगण्यातलं
हुरूप असते माय
माय नसते कधीमधी
नित्यच असते माय
कवी विजय गुंडेकर यांनी आपली राजकारणावरील कविता सादर केली.
" फुकटच्या वाहनात"
लाखो रुपयांच्या सुंदर मंडपात
थाटात कसा रंगला
निस्तेज आश्वासनांचा
दिमाखदार सोहळा
फुकटच्या वाहनात
तळपत्या उन्हा
मजूर बिडी तोंडात
फटाक्याच धोतरात
कान,नजर पोशिंद्याची
मंत्र्याच्या भाषणात.
या कवितेतून राजकारणावर ताषोरे ओढले
कवि कलानंद जाधव यांनी आपली कविता "आरं दादा"
आरं कशाचा तज्ञ ?
तू बण मर्मज्ञ
छाती काढून पुढं चाल
दे मिशांना पीळ
सोड भाषा मिळ मिळ
थोडंसं बुद्धिला तान,तुच सार्या जगाची शान ।धृ।
तुझ्या भोवतीनं फिरती भित्रे कोल्हे
खच्ची कराया नाना परिचे हल्ले
पाहून एकजुट पाडतील विचारात फुट
तंगडं धरुन घुमऊन हान ।
आरं बाबा तू सार्या जगाचा बाप
तुझ्या भोवतीनं नकोस वाढऊ ताप
कशाचा ऋणको ? तू धनकोचा धनको
ठेव जरासं घामाच भान
आशा अनेक कविता सादर करण्यात आल्या. यामध्ये कवी शिवाजी,कऱ्हाळे, प्रा कऱ्हाळे, राजकुमार नायक, डॉ.निखिल नायक, संदिप पाटील गोरेगावकर, जया करडेकर, कल्याणकर ताई, वंदना काबरा, शेख सय्यद, कवी गुठ्ठे मामा, सौ.देशमुख, गणेश येवले, बालाजी शेळके आदींनी आपल्या कविता सादर केल्या. कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या सर्वांनी परिश्रम घेतले. या कविसंमेलनाचे संयोजक कवी विजय गुंडेकर, सौ सिंधूताई दहिफळे, दिलीप धामणे, कलानंद जाधव, यांनी केले होते.
आभार जया करडेकर देशमुख यांनी मानले,
टिप्पणी पोस्ट करा