हिंगोलीतीत सोनोग्राफी सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरास शिक्षा
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
18 फेब्रुवारी 2024
हिंगोली शहरातील निदान इमेजींग
सोनोग्राफी सेंटरवर गर्भधारणा पूर्व व प्रसुती पूर्व लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम २००३ कायद्याअंतर्गत डॉ. सुदेश भारतीया यांना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने दोन महिने शिक्षा व दोन हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
हिंगोली शहरातील डॉ. सुदेश भारतीया यांचे निदान इमेजींग सोनोग्राफी सेंटर नोंदणी करून असून मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. २०११ मध्ये पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत धडक मोहीम पूर्ण महाराष्ट्र मध्ये समुचित प्राधिकारी मार्फत राबविण्यात आली होती. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी त्यांच्या टीम सह निदान डायग्नोस्टिक सोनोग्राफी सेंटर तपासण्याकरिता गेले होते. त्यावेळेस त्यांना सोनोग्राफी सेंटर मध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे डॉ. सुदेश भारतिया यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. डॉ. अशोक बोल्डे यांनी न्यायालयात फिर्याद म्हणून पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत डॉ.
जिल्हा व सत्र न्यायालयाने पीसीपीएनडीटी कायद्यानुसार दोन महिन्याची शिक्षा व दोन हजार रुपये ठोठावला दंड
सुदेश भारतिया यांच्याविरुद्ध प्रकरण दाखल करण्यात आले. त्या कार्यक्रमांमध्ये विधी समुपदेशक म्हणून वेळोवेळी अॅड. ढवळे सुकेशीनी यांनी पीसीपीएनडीटीचे कामकाज पाहिले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक सरकारी वकील निखिल तुकाराम चंदेल यांना अंतिम युक्तिवाद करण्यास मदत केली होती. प्रकरणात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. जी. देशमुख यांनी निकाल देताना न्यायालयापुढे आलेल्या पुरावाच्या आधारे डॉ. सुदेश भारती यांना पीसीपीएनडीटी कायद्या अन्वये दोषी आढळल्याने डॉ. सुदेश भारतीय यांना दोन महिने साधा कारावास व एकूण दोन हजार रुपये दंड ठरवण्यात आलेला आहे. साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस एस. बी. तोडेवाले यांनी मदत केली.
टिप्पणी पोस्ट करा