माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी हिंगोलीत
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
21 फेब्रुवारी 2024
हिंगोली शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी हिंगोलीत येत आहेत. हिंगोलीसहीत लोकसभा मतदार संघात एकूण चार ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे.
शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर पक्षप्रमुखांनी शिंदे गटात गेलेल्या आमदार- खासदारांच्या मतदार संघावर विशेष लक्ष देत आहेत. हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडूण आलेल्या हेमंत पाटील हे शिवसेनेचेच खासदार होते. या मतदार
संघात मागील काही निवडणुकांपासून आलटून पालटून काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांकडेच खासदारकी राहत आहे. महाविकास आघाडीमध्ये हिंगोलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा सांगणारे अशोक चव्हाण स्वतःच भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे काँग्रेसचा दावा कमकुवत झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे सक्षम उमेदवार समजले जात आहेत; परंतु त्यांनी स्वतः कधीच लोकसभा लढविण्याबाबत वाच्यता केली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही ताकद पक्षफुटीनंतर विभाजीत झाली
आहे. यामुळे महाविकास आघाडीत पक्षपातळीवर शिवसेनेचा दावा तसा मजबूत आहे. शिवसेना त्यागल्यानंतर एकाही नेत्यावर गुलाल पडल्याचा हिंगोली जिल्ह्यात तरी इतिहास नाही. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हिंगोली लोकसभेसाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे बोलले जात आहे. हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव सध्या शिवसेनेतर्फे चर्चेत आहे. त्यांच्याशिवाय माजी खासदार सुभाष वानखेडे हे एक ज्ञात इच्छुक उमेदवार आहेत. हे दोघे नांदेड जिल्ह्यातील आहेत. यापूर्वी
पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातीलच उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षाकडे केली होती.
उद्धव ठाकरे २३ फेब्रुवारी रोजी विदर्भातील मेहकर येथून जिल्ह्यात दाखल प्र होऊन सेनगाव येथे पहिली सभा घेणार आहेत. त्यानंतर कळमनुरी येथील सभा १ घेऊन ते हिंगोलीत मुक्कामी राहणार 9 आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी प उमरखेडला सभा घेऊन दुपारी वसमतची सभा घेणार आहेत. त्यानंतर ते नांदेडला रा जाणार आहेत. दोन दिवसांच्या व पक्षप्रमुखांच्या दौऱ्यासाठी शिवसैनिकांतर्फे जोरदार तयारी सुरू झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा