हिंगोलीत छऱ्याची पिस्टल जप्त पोलिसात एकावर गुन्हा दाखल

हिंगोलीत छऱ्याची पिस्टल जप्त पोलिसात एकावर गुन्हा दाखल 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22 फेब्रुवारी 2024
हिंगोली शहरातील आझम कॉलनी भागात एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडून पोलिसांच्या विशेष पथकाने याची पिस्टल जप्त केली असून या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २१ दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पिस्टल हुबेहुब खरोखरच्या पिस्टल सारखे दिसत असल्याने पोलिसही चक्रावून गेले होते; मात्र अधिक तपासणीत ते छऱ्याचे पिस्टल असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आझम कॉलनी भागात आज सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास एक विधी संघर्षग्रस्त बालक विनाकारण गोंधळ घालत असून त्याच्या कडे पिस्टल सारखे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार विशेष पथकाचे उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार अमित जाधव, विनोद दळवी, शेख मोहसीन, गजानन कोठूळे यांच्या पथकाने आझम कॉलनी परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकाची चौकशी करून त्याची तपासणी केली. यामध्ये त्याच्या जवळ याचे पिस्टल असल्याचे दिसून आले. त्याच्या जवळील पिंस्टल ताब्यात घेऊन त्याची पाहणी केली असता त्यास लोखंडे बॅरेल, ट्रिगर, ट्रिगर गार्ड दिसून आले सदर पिस्टल हुबेहुब खऱ्या पिस्टल सारखे दिसत होते. मात्र सदर पिस्टल याचे असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर पिस्टल जप्त करण्यात आले आहे.  पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या आदेशाने जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने