हिंगोलीत अपघातग्रस्ताच्या मदतीला गेलेल्या पोलिसाला दोघांनी केली मारहाण

अपघातग्रस्ताच्या मदतीला गेलेल्या पोलिसाला  दोघांनी केली मारहाण

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
07फेब्रुवारी 2024
हिंगोली • बळसोंड
भागातील स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ मोटरसायकलचा अपघात झाल्याने मदतीसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास अरेरावीची भाषा वापरून मारहाण केल्यानै दोघावर गुन्हा नोंदविण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास हिंगोली ग्रामीण सरोदे यांना अरेरावीची भाषा
पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी श्रीकांत अशोकराव सरोदे आपले कर्तव्य बजावून घरी जात असताना बळसोंड दोन भागातील स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ असलेल्या रस्त्यावर दोन मोटरसायकलचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अपघातात कोणास दुखापत झाली का अशा हेतुने ते मदतीकरिता गेले असता त्या ४ ठिकाणी असलेल्या सोनु जाधव व कृष्णा शेळके या दोघांनी
वापरून आम्ही आमचे पाहुन घेतो असे म्हणताच सरोदे यांनी त्यांना मी पोलिस आहे व आपल्याला मदत करण्याकरिता आलो आहे असे म्हणुन डायल ११२ च्या वाहनास फोन करीत असताना पोलिसांना बोलावून आमच्यावर गुन्हा दाखल करतो का असे म्हणून त्यांना शिवीगाळ केल्यानंतर धक्काबुक्की केली व एका आरोपीने त्याच्या हातातील कड्याने सरोदेच्या डोक्यात
मारून जखमी करून जीवे
मारण्याची धमकी दिली. मारहाण केल्याने सरोदे हे जखमी झाल्यामुळे त्यांना तात्काळ हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणात ५ फेब्रुवारीला हिंगोली ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सोनु जाधव, कृष्णा शेळके या दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष वाठोरे हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने