अंगणवाडी सेविका यांचे हिंगोलीत एचआयव्ही एड्स प्रशिक्षण संपन्न

अंगणवाडी सेविका यांचे हिंगोलीत एचआयव्ही एड्स प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
24 फेब्रुवारी 2024
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, हिंगोली यांच्या मार्फत शासकीय नर्सिंग महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे दिनांक 23-2-2024 रोजी अंगणवाडी सेविका यांचे करीता एकदिवसीय एचआयव्ही/ एड्स प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी एचआयव्ही/ एड्स विषयी सखोल प्रशिक्षण देऊन अंगणवाडी सेविका यांचा एचआयव्ही/ एड्स कार्यक्रमातील सहभाग कसा महत्वपूर्ण आहे याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच एचआयव्ही संसर्गीतांसोबतचा  कलंक व भेदभाव नष्ट करण्यासाठी श्रीमती अलका रणवीर यांनी मार्गदर्शन केले.
सदरील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या शेवटी मा. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दीपक मोरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री ज्ञानेश्वर चौधरी, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य श्री कुलदीप कांबळे, श्रीमती आशा खंदारे व इतर स्टाफ उपस्थित होते.
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक समुपदेशक श्री बालाजी चापाकानडे यांनी केले तर आभार श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले.
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी श्री आशिष पाटील, श्री संजय पवार, श्रीमती टिना कुंदणानी, श्रीमती लक्ष्मी वाठोरे व श्री दींडे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने