बहुचर्चित खून प्रकरणात पाच आरोपीस जामीन मंजुर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
24 फेब्रुवारी 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की
आरोपी नामे सुनीता जाधव, अनुसया राठोड, बेबीबई राठोड, सोनाबाई राठोड, पूजा जाधव सर्व राहणार ब्राह्ममनवाडा, ता सेनगाव यांच्यावर बाळू राठोड रा ब्राह्माण वाडा ता सेनगाव, यांचा खून करण्याचा आरोपावरुन दि 9/10/2023 रोजी पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुरनं. 290/2023 कलम 302, 143, 147,148,149, 324,323 504 506 भां द वि अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरणात पाच आरोपीनि जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि. 17/2/2024 रोजी मा.जिल्हा न्यायाधिश श्रीमती माने मॅडम, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून 5 आरोपीना जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड सावखे,ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड .सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,adv रुपाली खिलारे मॅडम, आदिल शेख यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा