शिक्षणा करिता रमीज बेलदार यांची लंडनला(युके) निवड

शिक्षणा करिता रमीज बेलदार यांची लंडनला(युके) निवड 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
08 फेब्रुवारी 2024
हिंगोली येथील माणिक स्मारक आर्य विद्यालयाचा हा विद्यार्थी शेख रमीजराज बेलदार शिवाजी महाविद्यालय हिंगोली, याठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन नांदेड येथील सहयोग महाविद्यालयात सिव्हिल शाखेत पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. यानंतर औरंगाबाद येथील एमजीएम या विद्यापीठात सिविल बी टेक ची पदवी पूर्ण करून, प्रोजेक्ट मॅनेजमेंट (मास्टर्स डिग्री) या उच्च पदवीकरिता युनायटेड किंग्डम ( युके) लंडन, ब्रह्मिंगम सिटी युनिव्हर्सिटी या विद्यापीठात पुढील शिक्षणाकरिता निवड झाल्याने नुकतेच रवाना झाले. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खलील बेलदार यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत.
                  यावेळी यांना समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू असीम आजमी जी, आ. तानाजीराव मुटकुळे साहेब ,आ. संतोष दादा बांगर साहेब ,  भाजपाचे वरिष्ठ नेते तथा माजी आ. रामरावजी वडकुते साहेब, भाजपाचे नेते तथा पूर्व मुख्याधिकारी रामदास पाटील सर, काँग्रेसचे नेते जकी कुरेशी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ चव्हाण, सलीम भाई वारंगा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बि. डी. बांगर,  समाजवादी पक्षाचे प्रमुख प्रदेश प्रमुख महा सचिव परवेज सिद्दिकी साहेब सचिव अब्दुल रऊफ साहेब, भाजपा नेते गोवर्धन अण्णा वीरकुंवर, देशोन्नतीचे बसंत भैया भट्ट, शिवाजीराव मेटकर सर, ॲड. अखील अहेमद, विराट राष्ट्रीय लोक मंच चे शेख नईम शेख लाल, ज्येष्ठ पत्रकार शरद भैय्या जयस्वाल जी, सय्यद कोचिंग क्लासेसचे सय्यद सर, काँग्रेसचे नेते मिलिंद भाऊ उबाळे जी, विशाल भाऊ इंगोले जी, धनंजय मोटर्स चे गजानन काळे, बेलदार समाज संघटनेचे हाजी शेख शिकूर, हाजी शेख अफसर, शेख मुख्तार शेख नूर, शेख मेहबूब, हाजी अब्दुल खुद्दूस, हाजी शेख साबेर भाई नांदापूरकर, हनिफ भाई तांबोली, जमील भाई बागवान, पठान इम्रान खान व इतर आजी-माजी नगरसेवक आणि समाजातील शेकडो प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिकांनी भरभरून शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले.
               महाराष्ट्रातील बेलदार समाजाचा इतिहास बघता महाराष्ट्रातून हा पहिलाच विद्यार्थी युके युनायटेड किंग्डम ला ( लंडनला ) शिकण्या करिता जात असेल. म्हणून समाजातील प्रत्येक आई-वडिलांनी आणि स्वतः विद्यार्थ्यानी शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन उच्च शिक्षण घेण्याकरिता बाहेर देशालाही जायचे काम पडत असेल तर याकरिता मागेपुढे पाहू नये. आणि शिक्षणामुळेच आपण देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा किंवा स्वतःचा विकास घडवून आणू शकतो. अशी सूचना वजा अपीलिंग सत्काराला उत्तर देतानां शेख रमीज बेलदार यांनी बोलून दाखविली.

Post a Comment

أحدث أقدم