महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
09 फेब्रुवारी 2024
हिंगोली वन विभागाची मोठी कारवाई सागवान सह टेम्पो जप्त
सविस्तर माहिती आसी की
दिनांक 09/02/2024 रोजी मा. विभागीय वन अधिकारी हिंगोली श्री. मनोहर गोखले मा. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. हिंगोली मीनाक्षी पवार यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 09/02/2024 रोजी पहाटे 05.00 वाजता जाभरून-पुसेगाव रोडवर एमएच-34-एम-2502 टाटा कंम्पनीचा 407 टेम्पोमधून विनापासी विनापरवाना सागवान गोलमालाची वाहतूक होत असतांना पकडण्यात आला असून आरोपी मौसिन खाँ मनवर खाँ पठाण रा. जिंतूर जि. परभणी यांच्या विरूध्द (1) भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 41, 42 व 52 (2) महाराष्ट्र झाडे तोड अधिनियम, 1964 चे कलम 3 व 4 तसेच (3) महाराष्ट्र वन नियमावली, 2014 चे नियम 31 नुसार प्रथम वनगुन्हा क्रमांक 1/2024 दिनांक 09/02/2024 अन्वये कार्यवाही करण्यात आली असून एकुण मुद्देमाल टाटा कंम्पनीचा टेम्पो ज्याची किंमत 80 हजार व सागवान गोलमाल ज्यांची किंमत 48 हजार असा एकुण 128000/- मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास एस. एस. चव्हाण, वनपरिमंडळ अधिकारी, हिंगोली हे करीत आहेत.यापुढे ही कारवाई सुरूच राहील असे
विभागीय अधिकारी मनोहर गोखले यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला
बोलतांना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा