हिंगोलीत काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखलफेक आंदोलन सुधीर आप्पा सराफ

हिंगोलीत काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखलफेक  आंदोलन सुधीर आप्पा सराफ 
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
21जून2024
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोलीतील गांधी चौकात  चिखलफेक  आंदोलन करण्यात आले 
आज 21 जून रोजी 
 काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने  राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणा विरोधात चिखल फेको आंदोलन   सद्यस्थितीत महाराष्ट्रात व देशात एकाच पक्षाचे सरकार असून या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी,युवकांची बेरोजगारी इ. अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्वत्र अस्थिर परिस्थिती दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, लाखो शेतकऱ्यांना पिक विमा अद्यापही मिळालेला नाही,शेतकऱ्यांना आवश्यक असणारे खते,बी - बियाणे, कीटकनाशके इत्यादींचे भाव गगनाला भिडले असून त्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळत असल्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे पैसे,वेळ, व श्रम वाया जात असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. काळाबाजार करणाऱ्या संबंधित कंपन्यांवर शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही,  शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हा  विज उपलब्ध होत नाही.  शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. शेतमजूर कामगारांना व इतर मजुरांना नियमाप्रमाणे मजूर मिळत नाही. त्यांच्या हाताला रोजगार प्राप्त होत नाही.कुशल व अकुशल  तसेच प्रशिक्षित युवकांच्या हातांना काम नसल्यामुळे युवकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून  युवक उदासीन आहे. अनेक युवक त्यामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारित आहेत. त्यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंब विस्कळीत होत असून शासनाला याचे काहीही देणे घेणे नाही ही बाब गंभीर आहे.  व्यापाऱ्यांच्या बाबतीत अनेक व्यापारी फार मोठ्या प्रमाणात शासनाला जीएसटी व इन्कम टॅक्स द्वारे महसूल देतात परंतु त्यांना कुठल्याही सोयी सुविधा शासनामार्फत पुरविल्या जात नाहीत. महागाईने कळस गाठला असून गॅस, डिझेल,पेट्रोल च्या किमतीत वाढ झालेली आहे.   शासनाच्या  या सर्व धोरणा विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे जिल्हा उपाध्यक्ष  सुरेशअप्पा सराफ यांचे नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने चिखल फेको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी  बापूरावजी बांगर, विनायकराव देशमुख, सुधीर आप्पा सराफ  माजी नगर अध्यक्ष हिंगोली, शामरावजी जगताप, अनिल नेणवाणी, प्रकाशराव थोरात ,बसिद मौलाना, प्रकाशराव वाघ, मिलिंद उबाळे,माणिकराव देशमुख,मामुद बागवान,विशाल घुगे, जावेद कुरेशी,आरिफ लाला,  चांदू प्यारेवाले, बंटी नागरे, झुबेर मामु, शासन कांबळे,नितीन बांगर, शुभम सराफ, महेश थोरात, गजानन बांगर, विकी सराफ , पिनू कांबळे,खंडू कुटे, व अनेक कार्यकर्ते बहुसंख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने