रामदास पाटील यांची विधान परिषदेसाठी नावाची जोरदार चर्चा

रामदास पाटील यांची विधान परिषदेसाठी  नावाची जोरदार चर्चा

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22जून2024
हिंगोली : भाजपाचे लोकसभा प्रभारी
रामदास पाटील सुमठाणकर यांनी नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देवुन भाजपात सक्रीय सहभाग नोदवला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तर्फे ते प्रबळ दावेदार असताना पक्ष क्षेष्ठींच्या आदेशाने त्यांनी निवडणुक रिंगणातुन माघार घेतली. आता विधान परिषदेचे वारे वाहत असल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून पक्षक्षेष्ठीही विचाराधीन असल्याचे बोलले जावु लागले आहे.
रामदास पाटील सुमठाणकर हे लिंगायत समाजामधील एक मोठे नेतृत्व असून त्यांनी मांगील काही वर्षापुर्वी नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा
राजीनामा दिला. लोकसभा मतदार संघ बळकट करून भाजपासाठी पोषक वातावरण त्यांनी निर्माण केले होते. जवळपास त्यांची उमेदवारी निश्चीत होती. परंतु महायुतीच्या तडजोडीत ही जागा शिवसेनेला सुटली. त्यामुळे पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचा सन्मान ठेवुन त्यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी घेतली होती. या दरम्यान त्यांच्यावर हिंगोलीसह लातुर, मुंबईत प्रचारासाठी जबाबदारी सोपविली होती. ओबीसी चेहरा म्हणून लोकप्रिय असलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांना विधानसभेवर पक्षक्षेष्ठीनी संधी द्यावी अशी मागणी लिंगायत समाजासह ओबीसी समाजातुन केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने