जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून होणार सक्रिय
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
23जून2024
हिंगोली सह राज्यभरात
काही ठिकाणी बरसणारा, तर काही ठिकाणी पूर्णतः उघडीप घेतलेला मान्सून आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे; तसेच राज्याच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, यानुसार चांगला पाऊस पडला, तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
हवामान खात्याचा अंदाज मिळणार आहे.
पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यानुसार, राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची स्थिती सुधारेल. शिवाय पावसात हळूहळू वाढ होईल. शिवाय जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा